

वायरमन (तारतंत्री)
Wireman
या मुलांना आय.टी.आय मधील इलेक्ट्रिकल व्यवसायामध्ये प्रशिक्षण घ्यायचे असते परंतु 10 वी मध्ये कमी गुण मिळाल्यामुळे इलेक्ट्रिशिअन या व्यवसाया मध्ये प्रवेश मिळू शकत नाही अशी मुले वायरमन ह्या विषयांत प्रवेश घेऊ शकतात. साधारणपणे इलेक्ट्रिशिअन व वायरमन ह्या व्यवसायाचे अभ्यासक्रमाची तुलना केली असता दोन्ही व्यवसायाचे अभ्यासक्रम जवळ जवळ ९०% समान आहे. ह्या व्यवसायामध्ये आपल्याला विज आणि विजेची उपकरणे ह्यांच्या विषयी सखोल माहिती शिकायला मिळते. औद्योगिक क्षेत्रातील तसेच आपल्या नियमित आयुष्यातील बहुतेक क्रिया ह्या विजेच्या उपकरणाच्या सहाय्याने केल्या जातात. ह्या व्यवसायाच्या प्रशिक्षण कालावधीमध्ये वायरिंग व वायरिंग चे विविध प्रकार, वीज निर्मिती प्रक्रिया, ए.सी. आणि डी.सी. प्रवाह, अर्थिंग आणि विविध विद्युत उपकरणांविषयी तसेच घरातील वायरिंग, सर्व प्रकारच्या घरगुती व इंडस्ट्रियल मोटर्स त्यांची देखभाल व दुरुस्ती, घरगुती वायरिंग ची डिझाईन, भारतीय इलेक्ट्रि सिटी नियम तसेच इंडस्ट्री मध्ये होणाऱ्या सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिकल कामांविषयी प्रशिक्षण दिले जाते. ह्या व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्यांना दोन वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर एक वर्षाची शिकाऊ उमेदवारी (Aprenticeship) कारखान्यातून पूर्ण करावी लागते त्यानंतर वेगवेगळ्या शासकीय व खाजगी क्षेत्रातील कारखान्यामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.