
Discover Your Future With Chinchani ITI
Industrial Training Institutes provides training in technical field to it’s student. ITI is known for providing technical manpower to industries. These students are trained in basic skills required to perform jobs in the industry. L.J. Raut Industrial Training Institute, Chinchani was established in 1990 to impart the quality vocational training to the students. The institute imparts quality training with well equipped library and labs. It has nice atmosphere for training. The objective of the institute is to impart skills in various vocational trades to meet skilled manpower requirement of industry.

Future Students & Our Community

Best Curriculum & Infrastructure

100% Guaranteed Job Placement
Industrial Training Institute (ITI)
Our Courses & Trades
Mechanical Trades Welder – One Year Course Fitter – Two Year Course Electrical Trades Wireman – Two Year Course Electrician – Two Year Course Computer Faculty Computer Operator and Programming Assistant (COPA)– One Year Course
प्रवेश रद्द व शुल्क परतावा
1. प्रवेशित उमेदवार आपला प्रवेश औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस भेट देऊन आपला लॉग इन आय डी. वापरून ऑनलाईन पद्धतीने रद्द करू शकतो, त्यासाठी संबंधीत औद्योगिक प्रशिक्षण संस्था व उमेदवार दोघांना आपला लॉग इन आय डी. वापरून प्रवेश रद्द करावा लागेल.
2. ऑनलाईन प्रवेश प्रणालीच्या माध्यमातूनच प्रवेश रद्द करणे अनिवार्य आहे.
3. एखाद्या उमेदवाराने प्रवेश प्रक्रियेच्या कुठल्याही टप्प्यावर प्रवेश रद्द केला तर तो त्यानंतरच्या प्रवेश फेरीसाठी अपात्र ठरेल. तथापि, असे उमेदवार खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संस्था स्तरावरील जागांसाठी प्रवेशाच्या अंतिम तारखेपर्यंत पात्र राहतील.
4. प्रवेश रद्द करते वेळी शुल्क परतावा हा खालील प्रमाणे शुक्ल कपात करून दिले जाईल.
प्रवेशित उमेदवाराने त्याचा प्रवेश रद्द करण्यासंबंधी चा अर्ज चौथ्या प्रवेश फेरीच्या प्रवेश निश्चिती करण्याच्या शेवटच्या दिवशी व वेळेपूर्वी कार्यालयात दाखल केला असल्यास व्यवसायाच्या एकूण शुल्कातून १०००/- रुपये वजा करून उर्वरित रक्कम परत केली जाईल.
प्रवेशित उमेदवाराने त्याचा प्रवेश रद्द करण्यासंबंधी चा अर्ज प्रवेशाच्या अंतिम दिनांकानंतर कार्यालायात दाखल केला असल्यास अनामत रकमेशिवाय कोणताही परतावा दिला जाणार नाही.
उमेदवारांचे प्रवेश घेताना त्यांचा शाळा सोडल्याचा मूळ दाखला व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (SSC) परीक्षेचे मूळ गुणपत्रक संस्थेमध्ये जमा करून घेण्यात येईल. जो पर्यंत उमेदवार प्रवेश रद्द करीत नाही अथवा प्रशिक्षण पूर्ण करीत नाही तो पर्यंत मूळ प्रमाणपत्रे प्रशिक्षणार्थ्याला परत केली जाणार नाहीत.


कोपा (कॉम्पटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टन्स)
आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात Computer व Technology यांना किती महत्व आहे हे जवळपास आपल्यापैकी सर्वानाच माहित आहे. येणाऱ्या काही वर्षात सर्वच जागी तंत्रज्ञानच असेल त्यामुळे या ट्रेड ला एक विशिष्ट महत्व आहे. आपण आता बघूया कि या ट्रेड मध्ये आपल्याला काय काय शिकायला मिळणार आहे.
एका वर्षात तुम्हाला संगणकाची संपूर्ण प्राथमिक माहिती, ते कसे कार्य करते इंटरनेट काय आहे याबद्दल सांगितल्या जाते. संगणकाची प्राथमिक दुरुस्ती त्याची भाग त्याच्या सोबत असणाऱ्या बाकी वस्तू जसे कि प्रिंटर, स्कॅनर त्यांचा उपयोगात ते कसे इन्स्टॉल केले जाते हे सुद्धा तुम्हाला शिकविले जाते पुढे तुम्हाला मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सएल, पॉवर पॉईट सुद्धा शिकवले जाते MS-CIT मध्ये जे शिकवले जाते ते व त्याच्या पुढील सर्व ऍडव्हान्स माहिती COPA मध्ये शिकविले जाते.
संगणकामध्ये ऑपरेटिंग सिस्टम कशी लोड केल्या जाते ते संगणकाची दुरुस्ती तसेच HTML, JAVA SCRIPT यासारख्या संगणकीय भाषेचे ज्ञान सुद्धा दिले जाते तुम्ही त्याचा उपयोग करून वेबसाईट बनवू शकता. ACCOUNTANCY मध्ये वापरले जाणारे TALLY हे सॉफ्टवेअर सुद्धा पूर्ण शिकवले जाते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे CYBER SECURITY म्हणजेच वायरस व बाहेरील लोकां पासून आपली संगणक व आपली माहिती कशा प्रकारे सुरक्षित ठेवावी याचे ज्ञान तुम्हाला एका वर्षात या ट्रेड मध्ये मिळते.

इलेक्ट्रिशियन (ELECTRICIAN)
Two Year Course
औद्योगिक क्षेत्रातील तसेच आपल्या नियमित आयुष्यातील बहुतेक क्रिया ह्या विजेच्या उपकरणाच्या सहाय्याने केल्या जातात. ह्या व्यवसायाच्या प्रशिक्षण कालावधीमध्ये वार्यारंग व वायरिंग चे विविध प्रकार, वीज निर्मिती प्रक्रिया, ए.सी. आणि डी.सी. प्रवाह, अर्थिंग आणि विविध विद्युत उपकरणांविषयी तसेच घरातील वायरिंग, सर्व प्रकारच्या घरगुती व इंडस्ट्रियल मोटर्स त्यांची देखभाल व दुरुस्ती, घरगुती वायरिंग ची डिझाईन, इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्स तसेच इंडस्ट्री मध्ये होणाऱ्या सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिकल कामांविषयी माहिती दिली जाते प्रात्यक्षिक व सैद्धांतिक माहिती शिकविली जाते.

वायरमन (WIREMAN)
Two Year Course
औद्योगिक क्षेत्रातील तसेच आपल्या नियमित आयुष्यातील बहुतेक क्रिया ह्या विजेच्या उपकरणाच्या सहाय्याने केल्या जातात. ह्या व्यवसायाच्या प्रशिक्षण कालावधीमध्ये वायरिंग व वायरिंग चे विविध प्रकार, वीज निर्मिती प्रक्रिया, ए.सी. आणि डी.सी. प्रवाह, अर्थिंग आणि विविध विद्युत उपकरणांविषयी तसेच घरातील वायरिंग, सर्व प्रकारच्या घरगुती व इंडस्ट्रियल मोटर्स त्यांची देखभाल व दुरुस्ती, घरगुती वायरिंग ची डिझाईन, भारतीय इलेक्ट्रि सिटी नियम तसेच इंडस्ट्री मध्ये होणाऱ्या सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिकल कामांविषयी प्रशिक्षण दिले जाते.

फिटर (FITTER)
Two Year Course
हा व्यवसाय दोन वर्ष कालावधीचा असुन ह्या व्यवसायामध्ये आपल्याला विविध मशिनिंग ऑपरेशन, मार्किंग, मेजरिंग, कटिंग, प्रिसिजन रीडिंग, लेथ मशीन, शीट मेटल वर्क, वेल्डिंग वर्क, हायड्रोलिक आणि प्यूमाटिक सिस्टीम, मेटल्स, मेंटेनन्स अशा विविध प्रक्रियेविषयी प्रशिक्षण मिळते. ह्या व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण दोन वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर एक वर्षाची शिकाऊ उमेदवारी (Aprenticeship) कारखान्यातून पूर्ण करावी लागते त्यानंतर वेगवेगळ्या शासकीय व खाजगी क्षेत्रातील कारखान्यामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.

वेल्डर (Welder)
One Year Course
हा व्यवसाय एक वर्ष कालावधीचा असुन ह्या व्यवसायामध्ये आपल्याला आर्क वेल्डिंग, गस वेल्डिंग, Co2 वेल्डिंग, TIG, MIG, स्पॉट वेल्डिंग, प्लास्मा कटिंग अशा विविध वेल्डिंग प्रक्रिया शिकविल्या जातात. तसेच मेटल्स, मेंटेनन्स अशा विविध प्रक्रियेविषयी प्रशिक्षण मिळते. ह्या व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर एक वर्षाची शिकाऊ उमेदवारी (Aprenticeship) कारखान्यातून पूर्ण करावी लागते त्यानंतर वेगवेगळ्या शासकीय व खाजगी क्षेत्रातील कारखान्यामध्ये नोकरीच्या व स्वयंरोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.
Chinchani ITI
We’re a Trusted and Professional Training institute


Enquire with us
Training and Placement Process
100% Job Guarantee Courses
Admission Process
Best ITI Center Last 34 Years
These are the most Trending Courses in India where Chinchani ITI give 100% job Guarantee to the candidates. If a candidate takes any of the below trainings then its a surety from Chinchani ITI that you will be placed immediately after the trainings. We have a dedicated placement team working on trending career options in India.
