इलेक्ट्रिशिअन (वीजतंत्री)
Electrician
आय.टी.आय मधील या व्यवसायामध्ये विज आणि विजेची उपकरणे ह्यांच्या विषयी सखोल माहिती शिकायला मिळते. औद्योगिक क्षेत्रातील तसेच आपल्या नियमित आयुष्यातील बहुतेक क्रिया ह्या विजेच्या उपकरणाच्या सहाय्याने केल्या जातात. ह्या व्यवसायाच्या प्रशिक्षण कालावधीमध्ये वार्यारंग व वायरिंग चे विविध प्रकार, वीज निर्मिती प्रक्रिया, ए.सी. आणि डी.सी. प्रवाह, अर्थिंग आणि विविध विद्युत उपकरणांविषयी तसेच घरातील वायरिंग, सर्व प्रकारच्या घरगुती व इंडस्ट्रियल मोटर्स त्यांची देखभाल व दुरुस्ती, घरगुती वायरिंग ची डिझाईन, इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्स तसेच इंडस्ट्री मध्ये होणाऱ्या सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिकल कामांविषयी माहिती दिली जाते प्रात्यक्षिक व सैद्धांतिक माहिती शिकविली जाते. ह्या व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण दोन वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर एक वर्षाची शिकाऊ उमेदवारी (Aprenticeship) कारखान्यातून पूर्ण करावी लागते त्यानंतर वेगवेगळ्या शासकीय व खाजगी क्षेत्रातील कारखान्यामध्ये नोकरी च्या संधी उपलब्ध आहेत. तसेच डिप्लोमा इंजीनिअरिंग मध्ये पुढील शिक्षणासाठी थेट द्वितीय वर्षामध्ये प्रवेश मिळतो व पदवी अभ्यासक्रम सहज पूर्ण करता येतो.