

फिटर (जोडारी)
Fitter
ह्या व्यवसायात प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रात प्रचंड मागणी आहे. हा व्यवसाय दोन वर्ष कालावधीचा असुन ह्या व्यवसायामध्ये आपल्याला विविध मशिनिंग ऑपरेशन, मार्किंग, मेजरिंग, कटिंग, प्रिसिजन रीडिंग, लेथ मशीन, शीट मेटल वर्क, वेल्डिंग वर्क, हायड्रोलिक आणि प्यूमाटिक सिस्टीम, मेटल्स, मेंटेनन्स अशा विविध प्रक्रियेविषयी प्रशिक्षण मिळते. ह्या व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण दोन वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर एक वर्षाची शिकाऊ उमेदवारी (Aprenticeship) कारखान्यातून पूर्ण करावी लागते त्यानंतर वेगवेगळ्या शासकीय व खाजगी क्षेत्रातील कारखान्यामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. तसेच डिप्लोमा इंजीनिअरिंग मध्ये पुढील शिक्षणासाठी थेट द्वितीय वर्षामध्ये प्रवेश मिळतो पदवी अभ्यासक्रम सहज पूर्ण करता येतो.