कोपा (कॉम्पुटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टन्स)
आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात Computer व Technology यांना किती महत्व आहे हे जवळपास आपल्यापैकी सर्वानाच माहित आहे. येणाऱ्या काही वर्षात सर्वच जागी तंत्रज्ञानच असेल त्यामुळे या ट्रेड ला एक विशिष्ट महत्व आहे. आपण आता बघूया कि या ट्रेड मध्ये आपल्याला काय काय शिकायला मिळणार आहे.
एका वर्षात तुम्हाला संगणकाची संपूर्ण प्राथमिक माहिती, ते कसे कार्य करते इंटरनेट काय आहे याबद्दल सांगितल्या जाते. संगणकाची प्राथमिक दुरुस्ती त्याची भाग त्याच्या सोबत असणाऱ्या बाकी वस्तू जसे कि प्रिंटर, स्कॅनर त्यांचा उपयोगात ते कसे इन्स्टॉल केले जाते हे सुद्धा तुम्हाला शिकविले जाते पुढे तुम्हाला मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सएल, पॉवर पॉईट सुद्धा शिकवले जाते MS-CIT मध्ये जे शिकवले जाते ते व त्याच्या पुढील सर्व ऍडव्हान्स माहिती COPA मध्ये शिकविले जाते. संगणकामध्ये ऑपरेटिंग सिस्टम कशी लोड केल्या जाते ते संगणकाची दुरुस्ती तसेच HTML, JAVA SCRIPT यासारख्या संगणकीय भाषेचे ज्ञान सुद्धा दिले जाते तुम्ही त्याचा उपयोग करून वेबसाईट बनवू शकता.
ACCOUNTANCY मध्ये वापरले जाणारे TALLY हे सॉफ्टवेअर सुद्धा पूर्ण शिकवले जाते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे CYBER SECURITY म्हणजेच वायरस व बाहेरील लोकां पासून आपली संगणक व आपली माहिती कशा प्रकारे सुरक्षित ठेवावी याचे ज्ञान तुम्हाला एका वर्षात या ट्रेड मध्ये मिळते. तुम्ही हा ट्रेड केल्यावर POLYTECHNIC च्या COMPUTER ENGINEERING या ब्रांच च्या द्वितीय वर्षात प्रवेश मिळतो.
शासकीय नोकरीची संधी जवळपास केंद्र राज्य शासनाच्या सर्वच विभागात या ट्रेड साठी जागा उपलब्ध होतात. कारण आज असा एकही विभाग नाही ज्यामध्ये संगणकाचे काम नाही. शासकीय बँक, इंडियन ऑइल सारख्या पेट्रोलियम कंपन्या, ISRO, DRDO सारख्या रिसर्च इन्स्टिटयूट मध्ये सुद्धा तुम्हाला नोकरी मिळू शकते खाजगी नोकरी प्रत्येक खाजगी कंपनी मध्ये कॉप्युटर ऑपरेटर ची गरज असते. तुम्ही नामांकित कंपनी मध्ये कॉप्युटर ऑपरेटर या पदावर चांगल्या पगारावर काम करू शकता. एयरपोर्ट, कॉम्पुटर सेंटर, वेगवेगळे शोरूम येथे सुद्धा जॉब ची संधी उपलब्ध होते.